मध्य रेल्वेकडून गरजूंना सढळ हस्ते मदत

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारा गरजवंतांना जेवणाची व्यवस्था मागील काही दिवसां पासून सातत्याने केली जात आहे.कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लाॅक डाउनमुळे भारतीय

मुंबई:  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारा गरजवंतांना जेवणाची व्यवस्था मागील काही दिवसांपासून  सातत्याने  केली जात आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लाॅक डाउनमुळे भारतीय रेल्वेच्या सर्व मेल/एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्या 3 मे  पर्यंत रद्द करण्यात  आल्या आहेत. परंतु जीवनावश्यक वस्तु जसे औषधे,  भाज्या,  खाद्यपदार्थ देशाच्या एका भागातून दुस-या भागात जाण्यासाठी मध्य रेल्वे  माल गाड्या  आणि पार्सल गाडयांचे  संचालन काही दिवसां पासून सतत करीत आहे. 

याशिवाय मध्य रेल्वे, मुंबई विभागातील  वाणिज्य अधिकारी आणि वाणिज्य निरीक्षकांच्या टीमसह तिकीट तपासणी कर्मचा-यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्थात सेंट जॉर्ज रूग्णालय, पी. डि’मेलो रोड, आरसीटी मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, येथील स्थानक क्षेत्र आणि वाडीबंदर क्षेत्रात ५५० पेक्षा अधिक व्यक्तिंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.यासोबतच वाणिज्य विभागाने नियमित  गरजवंत लोकांना जेवणाची पाकीटे वितरित करण्यात आली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

1.  डॉकयार्ड रोड : ११०

2. वाडीबंदर        : २२०

3. रे रोड             : ८०

4. कर्नाक बंदर     : १०५

5. सीएसएमटी क्षेत्र :  २०

6. दादर                :  ४६

7. दिवा                 : २१०

8. तुर्भे माल शेड     : २७०

 

 लाॅकडाउन दरम्यान मध्य रेल्वेच्या अन्य विभागांप्रमाणे  मुंबई विभागही गरजवंतांना  आवश्यक मदत  पोहोचविण्यात महत्त्वाची   भूमिकाही मध्य रेलवे निभावत असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.