धनगरांना आरक्षण द्या अन्यथा सरकारशी संघर्ष अटळ : गोपीचंद पडळकर

राज्यात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) रणकंदन सुरु असतानाच आता धनगर समाजही (Dhangar Reservation) आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास राज्य सरकार आणि धनगर समाजातील संघर्ष अटळ आहे, असा इशारा आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, “धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही जुनी मागणी आहे.या मागणीसाठी लोकांच्या भावना तीव्र आहेत. हा समाज गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करत आहे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून धनगर आरक्षणावर एकही बैठक आजवर झालेली नाही. कोर्टात केस सुरु आहे तिथे एखादा चांगला वकील देणं वैगेरे असेही काही प्रयत्न या सरकारकडून झालेले नाहीत.आमच्या मुलांच्या हातात एसटीचा दाखला द्या हीच आमची सरकारकडे मागणी आहे. ही मागणी तातडीने पूर्ण करा अन्यथा राज्य सरकार आणि धनगर समाजातील संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.