शाहुवाडी तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात सापडली सोन्याची नाणी, प्रशासनाकडे राष्ट्रीय संपत्ती म्हणून केली जमा

कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील अणुस्कुरा घाटातील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करताना,चक्क सोन्याच्या नाण्यांनी भरलेले हंडे सापडल्याने जिल्हाभर त्याची चर्चा सुरू आहे.या हंड्यात ७१६ सोन्याची नाणी आहेत.

कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील अणुस्कुरा घाटातील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करताना,चक्क सोन्याच्या नाण्यांनी भरलेले हंडे सापडल्याने जिल्हाभर त्याची चर्चा सुरू आहे.या हंड्यात ७१६ सोन्याची नाणी आहेत. आता हे घबाड सापडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे विनायक बाबासो पाटील.या शेतकऱ्याने आपल्या शेतात सापडलेली गुप्त धनाची एकूण ७१६ सोन्याची नाणी राष्ट्रीय संपत्ती म्हणुन हा पुरातन खजिना प्रामाणिकपणे प्रशासनाकडे सुपुर्द केला आहे. 

अणुस्कुरा घाटातील गट नंबर १८६ मध्ये आपल्या शेतात मान्सून पूर्व मशागत केल्यानंतर काजूची लागवड करताना  बुधवारी रात्री एका मातीच्या मडक्यात अनेक वर्षांपूर्वी जमिनीत पुरून ठेवलेला हा खजिना सापडला.याची कुणकुण लागताच शाहूवाडी पोलिसांनी या शेतकऱ्याच्या शेताकडे धाव घेतली. ही  राष्ट्रीय संपत्ती असल्याचे सांगून सर्व सोन्याची सर्व नाणी आणि मातीच्या मडक्याचे तुटलेले तुकडे आपल्या ताब्यात घेतले. या विनायक पाटील नावाच्या शेतकऱ्याने सुद्धा निमूटपणे आपल्या शेतात सापडलेली सर्व नाणी प्रशासनाला सुपूर्द केली,प्रशासनाने  रितसर पंचनामा करून ही प्राचीन सुवर्ण नाणी ताब्यात घेतली आहेत.आता ही प्राचीन नाणी शाहूवाडी तहसील कार्यालयात लॉकरमध्ये सीलबंद करून ठेवलेली आहेत. २ सेमी व्यास व २ मि.मि. जाडीचे चांदी व सोन्याची नाणी ही असल्याची माहिती शाहुवाडीचे प्रांताधिकारी अमित माळी यांनी नवराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना दिली.