वारकरी संप्रदायाचे  ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांचे निधन ;वारकरी संप्रदायावर शोककळा

पंढरपूर : वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. श्री . निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता शेगावजवळील त्यांच्या टाकळी या मूळ गावी देहत्याग केला

पंढरपूर : वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. श्री . निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता शेगावजवळील त्यांच्या टाकळी या मूळ गावी देहत्याग केला. त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात २ मुले, २ मुली, ३ सुना, २ जावई, नातवंडे असा परिवार आहे. वक्ते महाराज यांना वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु म्हटले जाते. त्यांनी अखंड ज्ञानदानपरायण केले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना शासनाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार प्राप्त झालेला. ह.भ.प.श्री. निवृत्ती महाराज वक्ते यांच्यावर २१ डिसेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.