hasan mushrif

अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे अशी मागणी गेल्या काही वर्षापासुन प्रलंबित होती. मात्र आज झालेल्या बैठकीत यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ(labor Welfare Board) स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी दिली.

    मुंबई : महाराष्ट्रात(Maharashtra) जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. साडेचार लाख यंत्रमागाशी निगडीत कामगार असुन ते असंघटीत कामगार म्हणुन आजपर्यंत त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे अशी मागणी गेल्या काही वर्षापासुन प्रलंबित होती. मात्र आज झालेल्या बैठकीत यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांनी दिली.

    मुश्रीफ यांनी सांगितले की, आज मंत्रालयात राज्यातल्या वस्त्रोद्योग विभागातील लोकप्रतिनिधी आणि यंत्रमाग मालक संघटना व कामगार संघटना तसेच इतर वस्त्रोद्योगातील तज्ञ मंडळीसोबत बैठक घेतली. सध्या असणाऱ्या नवीन सुचनेचा विचार करुन बांधकाम कामगार महामंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

    या बैठकीसाठी कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार अनील बाबर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार मुनीफ इस्माईल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेदसिंगल, विकास आयुक्त (असंघटीत कामगार) डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव यांच्यासह मदन कारंडे,माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार नरसिह आडम, अमित गाताडे, सतीश कोष्टी, विनयजी महाजन , महादेव गौड, बंडुपंत मुसळे, राजीव पारीख, सुनील शिंदे, उदयसिंग पाटील, कामगार नेते दत्ता माने, भरमा कांबळे, तसेच मालेगाव, भिंवंडी, सोलापुर, सांगली व इचलकरंजी येथील मालक संघटना व कामगार संघटनेचे प्रतिनिधी हजर होते.