प्रकरण गंभीर पण सरकार खंबीर, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य शासन सज्ज असल्याची आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

डेल्टा प्लसचे(Delta Plus Patients) रुग्ण आता पुन्हा वाढलेले आहेत. कालच या तपासणीमध्ये पुन्हा नवीन २७ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एकूण १०३ नवीन रुग्ण आहेत. डेथ रेट कमी आहे. परंतु संक्रमणामध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे आम्ही डेल्टा प्लस वर लक्ष ठेवून आहोत, असे टोपे यांनी सांगितले आहे.

    मुंबई : कोरोना रुग्ण संख्या(Corona Patients) जरी वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे(Health Minister Rajesh Tope) यांनी केलं आहे. डेल्टा प्लसचे(Delta Plus Patients) रुग्ण आता पुन्हा वाढलेले आहेत. कालच या तपासणीमध्ये पुन्हा नवीन २७ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत एकूण १०३ नवीन रुग्ण आहेत. डेथ रेट कमी आहे. परंतु संक्रमणामध्ये वाढ होऊ शकते त्यामुळे आम्ही डेल्टा प्लस वर लक्ष ठेवून आहोत, असे टोपे यांनी सांगितले आहे.

    तिसऱ्या लाटेसाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या केलेल्या आहेत. तिसऱ्या लाटेसाठी आम्ही तयार आहोत अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दहीहंडी आयोजनावरून विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर बोलताना एपीडिमिक कायद्याअंतर्गत राज्य सरकारला अशा परिस्थितीत काय करावं आणि काय करु नये याचे अधिकार दिलेले असतात आणि त्या सूचनांचं पालन करणं हे एक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे यात कुठल्या प्रकारचं राजकारण करण्याची गरज नाही . तिसऱ्या लाटेचा धोका पुढे घेऊ नये आणि यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी याचं पालन नक्की करावं अस आवाहन त्यांनी केलं आहे .