कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी केंद्र सरकारकडून पत्र आले नाही पण राज्य सरकारची आरोग्य सुविधांबाबतची तयारी पूर्ण  – राजेश टोपे

जरी तिसरी लाट(Third Wave) आली तरी घाबरण्यासारखे कारण नाही, कारण राज्य शासनाची पूर्ण तयारी आहे. आरोग्य विभागात अतिरिक्त जागा भरण्याचा विषय असेल किंवा मेडिसन किंवा ट्रेनिंग या सर्व संदर्भात गांभीर्याने विचार करुन तिसऱ्या लाटेची आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)यांनी दिली आहे.

    कोरोनाची तिसरी लाट(Corona Third Wave) सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. तसेच या लाटेत दररोज चार ते पाच लाख एवढे कोरोनाचे रुग्ण (Corona patients)आढळतील अशी भीतीसुद्धा नीती आयोगाने व्यक्त केली आहे. पण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नीती आयोगाकडून असे कोणते पत्र(Letter About Corona Third Wave) आले आहे का असा प्रश्न विचारला असता, असे कोणतेही पत्र केंद्राकडून आले नसल्याचे राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी सांगितले.

    केंद्र शासनाने जून महिन्यामध्ये आम्हाला तिसऱ्या लाटेबदद्ल पत्र लिहले होते.मात्र सध्या केंद्राकडून कोणतेही पत्र आले नाही. त्यावेळी त्यांनी असे निदर्शनास आणलं होतं, साधारण चार ते पाच लाख दररोज सप्टेंबर महिन्याच्या कोरोनाचे रुग्ण आढळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण तो या महिन्याचा पत्रव्यवहाराचा विषय नाही.

    जरी तिसरी लाट आली तरी घाबरण्यासारखे कारण नाही, कारण राज्य शासनाची पूर्ण तयारी आहे. आरोग्य विभागात अतिरिक्त जागा भरण्याचा विषय असेल किंवा मेडिसन किंवा ट्रेनिंग या सर्व संदर्भात गांभीर्याने विचार करुन तिसऱ्या लाटेची आम्ही तयारी केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.