हवामान विभागाकडून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर, चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल

हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाकडून रेड अलर्ट(Red Alert For Raigad And Ratnagiri District) जाहीर करण्यात आला आहे.

    राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची (Heavy Rain)शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाकडून रेड अलर्ट(Red Alert For Raigad And Ratnagiri District) जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत होऊ शकते. महत्वाचं म्हणजे चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत आहे. चिपळूणमध्ये पुन्हा एकदा महापुराची भीती असल्याने आधीच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे.


    दरम्यान मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर सध्या दिसून येत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस(Heavy Rain In Ratnagiri) कोसळत असून प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. जिल्ह्यात ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला असून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याच्या दापोली, चिपळूणमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र आहे.गुहागर भागात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचे वृत्त आहे.