corona

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.आठवडाभरात देशात ३१ टक्के रुग्ण वाढले आहेत.देशात सर्वाधिक रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात(corona spread in maharashtra) झाली आहे.

  भारतामध्ये(corona in India) गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे(corona) १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णसंख्येसोबतच भारतामधील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा एक कोटी १० लाखांच्या वर गेला आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.आठवडाभरात देशात ३१ टक्के रुग्ण वाढले आहेत.देशात सर्वाधिक रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात(corona spread in maharashtra) झाली आहे.

  सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट अली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात सरकारी यंत्रणा आणि तज्ज्ञांनी स्पष्टपणे कोणतीही थेट भूमिका स्पष्ट केली नसली तरी सध्या सुरु असणारी रुग्णवाढ ही नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ आहे.

  रविवारी कोरोनामुळे देशभरामध्ये ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या एक लाख ५६ हजार ३८५ वर गेली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ९७.२२ पर्यंत गेली आहे. कोरोनावर आतापर्यंत एक कोटी सहा लाख ९९ हजार ४१० जणांनी मात केली आहे. असं असलं तरी नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी आहे.

  गेल्या पाच आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच सात दिवसांचा विचार केल्यास देशातील करोनाबाधितांच्या संख्येत एक लाख रुग्णांची भर पडली आहे. फेब्रुवारी २१ रोजी संपलेल्या आठवड्यात भारतामध्ये कोरोनाचे एक लाख ९९० हजार रुग्ण आढळले. या पूर्वीच्या आठवड्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या ७७ हजार २८४ इतकी होती. म्हणजेच गेल्या आठवड्यामध्ये देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

  सर्वाधिक रुग्णवाढ झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये सहा हजार ९७१ रुग्ण आढळून आले असून ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या १२१ दिवसांमधील हा सर्वाधिक आकडा आहे. या रुग्णवाढीमुळे लॉकडाऊनबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

  मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८१ टक्क्यांनी वाढली आहे. २१ फेब्रुवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये महाराष्ट्रात ३६ हजार ६०६ रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा रविवारी केली. पुढील आठ दिवसांमध्ये राज्यातील रुग्णसंख्या कशी वाढते किंवा कमी होते त्यानुसार लॉकडाउनसंदर्भातील निर्णय़ घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. लॉकडाऊन हा पर्याय नसला तरी करोनाची साखळी तोडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.