विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांना हकलपट्टी करण्यासाठी भाजप कार्यालयासमोर झालेल्या तीव्र आंदोलनात सरकारवर टीका केली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, परंपरेला काळीमा फासणारी गोष्ट झाली आहे. रक्षक भक्षक बनत असेल, कुंपणच जर शेत खात असेल तर राज्यातील जनता कोणावर विश्वास ठेवणार असा प्रश्न जनतेसमोर उभा होत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. 

    मुंबई : परमबीर सिंहांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकारची अब्रू वेशीला टांगली आहे. अनिल देशमुख यांनी वाझेंना वसुलीच काम दिले होते का? हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावे तसेच संशयित असलेल्या अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा”, अशी थेट मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

    कुंपणच शेत खात आहे?

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांना हकलपट्टी करण्यासाठी भाजप कार्यालयासमोर झालेल्या तीव्र आंदोलनात सरकारवर टीका केली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, परंपरेला काळीमा फासणारी गोष्ट झाली आहे. रक्षक भक्षक बनत असेल, कुंपणच जर शेत खात असेल तर राज्यातील जनता कोणावर विश्वास ठेवणार असा प्रश्न जनतेसमोर उभा होत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच अशी गोष्ट झाली नाही. राजकीय स्वरूपात गुन्हेगारी प्रवृत्ती होत असते, आरोप होत असतात परंतु दस्तूरखुद्द राज्याचा पोलीस अधिकारी परमबीर सिंग पत्राद्वारे जर सांगत असेल, शंभर कोटोची खंडणी वाझेच्या माध्यमातून झाली पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी जर बाहेर येत असतील तर राज्याच्या पोलिस खात्यात काय चालले आहे असा सवाल दरेकर यांनी केला.

    “ज्यावेळी विधिमंडळात आम्ही हा विषय मांडत होतो, त्यावेळी वाझेंची पाठराखण कोण करत होते? खरं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिसांची इभ्रत धुळीला मिळविण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा देण्याची आवश्यकता आहे, नाहीतर राज्याच्या मुख्यमंत्री यांनी आपली प्रतिमा वाचवण्यासाठी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा”:

    -प्रविण दरेकर

    सत्यस्थिती जनतेला समजली

    दरेकर म्हणाले की, सरकार खंडणी मागण्यासाठी आहे का ? हा निंदनीय असा आरोप आहे. सत्य वस्तूस्थिती हे राज्यातील जनतेला समजली पाहिजे. त्यामुळे ह्याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी दरेकर यांनी आंदोलनात केली.