चक्रीवादळाचा फटका बसलेल्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा दिलासा, ८ जूनपासून पुन्हा परीक्षा घेणार

तौक्ते चक्रीवादळामुळे(Tauktae Cyclone) व इतर तांत्रिक कारणामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघरबरोबरच मुंबई, ठाणे, रायगड येथील काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. जे विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पुनर्परीक्षा(Exam Rescheduled For IDOL) ८ जूनपासून ऑनलाईन(Online Exam) पद्धतीने घेण्यात येणार आहे.

  मुंबई: तौत्के चक्रीवादळामुळे(Tauktae Cyclone) परीक्षा न दिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या(Mumbai University) दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉमचे पुनर्परीक्षार्थी व व्दितीय वर्ष बीए, बीकॉमचे नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यासाठी पुनर्परीक्षा ८ जूनपासून ऑनलाईन (Online Exam Reschedule) पद्धतीने घेण्यात येणार आहे.

  १८ ते ३१ मेदरम्यान आयडॉलच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉमची पुनर्परीक्षा व व्दितीय वर्ष बीए, बीकॉमची नियमित व पुनर्परीक्षा झाली. या परीक्षेच्या दरम्यान तौक्ते चक्रीवादळामुळे व इतर तांत्रिक कारणामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघरबरोबरच मुंबई, ठाणे, रायगड येथील काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. जे विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पुनर्परीक्षा ८ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

  परीक्षेस अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची नवीन लिंक विद्यार्थ्यांच्या ईमेलवर पाठविली जाणार आहे. या पुनर्परीक्षेचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

  निवडणुकांमध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवाबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करायला हवी, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  तौक्ते चक्रीवादळामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी आयडॉलने पुनर्परीक्षेची संधी दिली आहे. विद्यार्थ्यांनी ही पुनर्परीक्षा द्यावी असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.