शाळेची घंटा लवकरच वाजणार ,विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तयारी पूर्ण झाल्यास चाइल्ड टास्क फोर्स शाळा सुरु करण्यास तयार

चाइल्ड टास्क फोर्स(Child Task Force) सदस्य समीर दलवाई(Sameer Dalwai) म्हणाले, ‘शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तयारी पूर्ण झाली तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नाही.

    मुंबई: राज्यात शाळा(Schools In Maharashtra) नेमका कधी सुरू होणार? याची वाट संपूर्ण महाराष्ट्रातले पालक बघत आहेत. याविषयी चाइल्ड टास्क फोर्स(Child Task Force) सदस्य समीर दलवाई(Sameer Dalwai) म्हणाले, ‘शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तयारी पूर्ण झाली तर शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. लहान मुलांचे लसीकरण जरी ऑक्टोबरपासून सुरू होत असले तरी लसीकरण सुरू होण्याचा आणि शाळा सुरू करण्याचा कोणताही संबंध नाही.

    यावेळी दलवाई यांनी सांगितलं, मुलांना होणारा कोरोना संसर्ग सौम्य असतो. प्रौढांना होणारा संसर्ग गंभीर असतो. त्यामुळे शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण संपूर्ण व्हायला हवं. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणंही आवश्यक आहे. लहान मुलांच्या लसीकरणाचा आणि शाळा सुरु करण्याचा काही संबंध नाही. शाळा सुरु करायच्या असतील तर मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन हेच नियम पाळावे लागतील.
    शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक असले तरी मुलांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे.