मुंबईमध्ये कोरोनाचे ३५७ नवे रुग्ण तर बाधितांची संख्या ४५८९ वर ; १२२ रुग्ण बरे

-कोरोनाबाधित ११ रुग्णांचा मृत्यू मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे ही होत आहेत. शुक्रवारी मुंबईमध्ये तब्बल १२२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी

-कोरोनाबाधित ११ रुग्णांचा मृत्यू

मुंबई :  कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे ही होत आहेत. शुक्रवारी मुंबईमध्ये तब्बल १२२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. मात्र त्याचवेळी तब्बल ३५७ रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा ४५८९ वर पोहचला आहे.शुक्रवारी ११ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १७९ झाली आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारीही वाढ कायम राहिली आहे. मागील काही दिवसां पासून मुंबईमध्ये सातत्याने ३०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत असून, शुक्रवारी मुंबईमध्ये ३५७ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले.यामध्ये २१ ते २२ एप्रिलदरम्यान विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या कोविड १९ चाचणीचा अहवालात पॉझिटिव्ह आलेल्या १६८ जणांचे अहवालांचा यात समावेश आहे. मात्र त्याचवेळी तब्बल १२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने मुंबईसाठी दिलासा देणारी बाब आहे. 

शुक्रवारी तब्बल १२२ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने ही बाब मुंबईसाठी दिलासा देणारी ठरली आहे. आजपर्यंत अवघे ५९५ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. तसेच मुंबईमध्ये ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १७९ वर पोचली आहे. ११ मृत झालेल्या व्यक्तींपैकी ७ जण हे दीर्घकाळ आजारी होते. मृतांमध्ये ७ जण पुरुष तर ४ जण महिला होत्या. यामध्ये ८० वर्षावरील एक, ४० वर्षांखालील एक आणि ९ रुग्ण हे ४० ते ८० वर्षादरम्यानचे होते. 

त्याचप्रमाणे कोरोनाचे ३५९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ७६०६ वर पोहचली आहे. कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या १८४ विशेष क्लिनिकच्या माध्यमातून आजपर्यंत ७२०३ जणांचे सर्वेक्षण करून त्यापैकी २४९४ संशयितांचे नमुने घेण्यात आले. तसेच आतापर्यंत ५३ हजार ३८६ इमारतीच्या आवारांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.