नागपुरात रविवारी कोरोना पाॅझटिव्ह रुग्णसंख्या १४ वर;‘जाणून घ्या!’ कोरोना Active रुग्णांची आकडेवारी

नागपूर महानगर पालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांनी (A joint effort by the Nagpur Municipal Corporation's health department and the district administration) शहरात नियंत्रणाबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती (the corona out of control) नियंत्रणात आणली.

    नागपूर (Nagpur). नागपूर महानगर पालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांनी (A joint effort by the Nagpur Municipal Corporation’s health department and the district administration) शहरात नियंत्रणाबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती (the corona out of control) नियंत्रणात आणली. दुसरी बाब म्हणजे नागपुरकरांनी कोरोना नियमांची केलेली अंमलबजावणी होय. आरोग्य विभागाकडून रविवारी प्राप्त अहवालानुसार शहरात रविवारी १४ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

    आरोग्य विभागाकडून रविवारी 6978 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सध्यापर्यंतचा एकूण कोरोना चाचण्यांचा आकडा 22 लाख 27 हजार 137 इतका आहे. कोरोनामुळे शहरात आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. आज कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण 19 आहे. एकूण बरे होणारी रुग्णसंख्या 03 लाख 29 हजार आहे. शहरात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी 0348 इतकी नोंदविण्यात आली.

    लाॅकडाउन काळात जिल्ह्यातील नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेऊन प्रशासनाने यात नियमांसह शिथिलता दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.