राज्यात गेल्या २४ तासांत २६४ पोलिसांना कोरोनाची लागण

राज्यात गेल्या २४ तासांत २६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची एकूण संख्या १२१ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावासोबतच मृतांच्याही संख्येत वाढ होताना दिसत आहे.

संपूर्ण देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसोबतच पोलीस योद्धांना सुद्धा कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आढळून आलं आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची एकूण संख्या १२१ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावासोबतच मृतांच्याही संख्येत वाढ होताना दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ११ हजार ३९२ इतकी झाली आहे. तर ९ हजार १८७ जण पूर्णपणे बरे झाले असून २ हजार ८४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. यामध्ये २५७ पोलीस अधिकारी आहेत. तर १ हजार ८२७ पोलीस कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे कोरोनामुक्त झालेल्या ९ हजार १८७ पोलिसांमध्ये ९११ अधिकारी आहेत. तर ८ हजार २७६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.