राज्यात २३४५ नवे रुग्ण, तर १४०८ रुग्णांना घरी सोडले

राज्यात ६४ रुग्णांचा मृत्यू मुंबई :राज्यात गुरुवारी २३४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१,६४२ झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना डिस्चार्ज देण्यात

राज्यात ६४ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गुरुवारी २३४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१,६४२ झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गुरुवारी १४०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ११ हजार ७२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

राज्यात गुरुवारी ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला असून त्यामध्ये मुंबई ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापूरात १ मृत्यू झाले आहेत. मृतांमध्ये ३६ पुरुष तर २८ महिला आहेत. ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,१९,७१० नमुन्यांपैकी २,७८,०६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१,६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५,८९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६४.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ४,३७,३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६,८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 

मुंबई महानगरपालिका २५५०० ८८२ 

ठाणे ३३८ ४ 

ठाणे मनपा २०४८ ३३ 

नवी मुंबई मनपा १६६८ २९ 

कल्याण डोंबवली मनपा ६४१ ६ 

उल्हासनगर मनपा १३१ २ 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 

भिवंडी निजामपूर मनपा ८० ३ 

मीरा भाईंदर मनपा ३६२ ४ 

पालघर १०२ ३ 

१० वसई विरार मनपा ४२५ ११ 

११ रायगड २८५ ५ 

१२ पनवेल मनपा २७१ ११ 

ठाणे मंडळ एकूण ३१८५१ ९९३ 

१३ नाशिक ११३ ० 

१४ नाशिक मनपा ८४ २ 

१५ मालेगाव मनपा ७१० ४३ 

१६ अहमदनगर ४७ ५ 

१७ अहमदनगर मनपा १९ ० 

१८ धुळे १५ ३ 

१९ धुळे मनपा ८० ६ 

२० जळगाव २५२ २९ 

२१ जळगाव मनपा ७९ ४ 

२२ नंदूरबार २६ २ 

नाशिक मंडळ एकूण १४२५ ९४ 

२३ पुणे २५५ ५ 

२४ पुणे मनपा ४२०७ २२२ 

२५ पिंपरी चिंचवड मनपा २०३ ७ 

२६ सोलापूर १० १ 

२७ सोलापूर मनपा ५१२ २७ 

२८ सातारा १८४ २ 

पुणे मंडळ एकूण ५३७१ २६४ 

२९ कोल्हापूर १४१ १ 

३० कोल्हापूर मनपा २० ० 

३१ सांगली ५४ ० 

३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १ 

३३ सिंधुदुर्ग १० ० 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 

३४ रत्नागिरी १२३ ३ 

कोल्हापूर मंडळ एकूण ३५७ ५ 

३५ औरंगाबाद २० ० 

३६ औरंगाबाद मनपा ११०६ ३९ 

३७ जालना ४३ ० 

३८ हिंगोली ११० ० 

३९ परभणी १५ १ 

४० परभणी मनपा ० 

औरंगाबाद मंडळ एकूण १२९७ ४० 

४१ लातूर ५१ २ 

४२ लातूर मनपा ० 

४३ उस्मानाबाद १९ ० 

४४ बीड १३ ० 

४५ नांदेड ११ ० 

४६ नांदेड मनपा ८१ ४ 

लातूर मंडळ एकूण १७८ ६ 

४७ अकोला २९ २ 

४८ अकोला मनपा ३१५ १५ 

४९ अमरावती २ 

५० अमरावती मनपा १३१ १२ 

५१ यवतमाळ १११ ० 

५२ बुलढाणा ३८ ३ 

५३ वाशिम ० 

अकोला मंडळ एकूण ६४१ ३४ 

५४ नागपूर ० 

५५ नागपूर मनपा ४३४ ६ 

५६ वर्धा १ 

५७ भंडारा ० 

५८ गोंदिया ० 

५९ चंद्रपूर ० 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 

६० चंद्रपूर मनपा ० 

६१ गडचिरोली ० 

नागपूर एकूण ४७४ ७ 

इतर राज्ये /देश ४८ ११ 

एकूण ४१६४२ १४५४