There are no bird flu cases in India State Health Department Instructions

उन्हाळ्यात कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम होतो. पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने ग्रामीण भागातील कुक्कुटपालन केंद्रे बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे सध्या बाजारात जिवंत कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. उन्हाळ्यात जिवंत कोंबड्यांचे (पक्ष्यांचे) वजन वाढत नाही.

    पुणे : काही महिन्यांपूर्वी बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे चिकनच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांकडून कोंबड्यांचे पालन कमी प्रमाणावर केले गेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चिकनच्या मागणीत वाढ झाल्याने जिवंत कोंबड्यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने चिकनच्या दरात वाढ झाली आहे. एरवी १५० ते १६० रुपये किलो असणाऱ्या चिकनचे दर आज अडीचशे रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.

    पुणे, पिंपरीत दररोज २०० ते २५० टन विक्री

    कोरोनाचा संसर्ग वाढल्याने चिकन तसेच अंडी सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या शहरातील हॉटेल बंद आहेत. त्यामुळे चिकनच्या मागणीत घट झाली असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दररोज दोनशे ते अडीचशे टन चिकनची विक्री होते. हॉटेल व्यवसाय सुरू असता तर चिकनची मागणी २८० ते ३०० टनांपर्यत गेली असती. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, नगर परिसरातील सुपा, शिरूर, सातारा रस्त्यावरील गावांमधील कुक्कुटपालन व्यावसायिक शहर परिसरात कोंबड्या विक्रीस पाठवितात, असे चिकन विक्रेत्यांनी सांगितले.

    जिवंत कोंबड्यांचा तुडवडा

    उन्हाळ्यात कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम होतो. पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने ग्रामीण भागातील कुक्कुटपालन केंद्रे बंद ठेवण्यात येतात. त्यामुळे सध्या बाजारात जिवंत कोंबड्यांचा तुटवडा जाणवत आहे. उन्हाळ्यात जिवंत कोंबड्यांचे (पक्ष्यांचे) वजन वाढत नाही. या कालावधीत पक्षी मोठ्या प्रमाणावर पाणी पितात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. कोंबड्यांचे खाद्य महाग झाले आहे. पक्ष्यांचे संगोपन करण्याचा खर्च वाढल्याने चिकनच्या दरात वाढ होत आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.