राज्यात कोरोना बळींच्या संख्येत वाढ ; सलग दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या तिशी पार

कोरोनाबाधितांची संख्या ९९१५ वर ; राज्यात ३२ जणांचा मृत्यू, ५९७ नवे रुग्ण मुंबई: कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची संख्या स्थिर असली तरी गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाबाधितांची संख्या ९९१५ वर  ; राज्यात ३२ जणांचा मृत्यू, ५९७ नवे रुग्ण

मुंबई:  कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची संख्या स्थिर असली तरी गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याच्या संख्येत वाढ झाली आहे. २० च्या घरात असणारा मृतांचा आकडा  सलग तीन दिवसांपासून तिशी पार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.बुधवारी राज्यात ३२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४३२ वर पोहचली आहे. राज्यात बुधवारी ५९७ नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांची संख्या ९९१५ झाली आहे.

राज्यामध्ये कोरोनामुळे दररोज २० पेक्षा कमी जणांचा मृत्यू होत असताना सोमवारपासून कोरोनामुळे मृत्यूच्या आकड्यात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.सोमवारी २७, मंगळवारी ३१ तर बुधवारी ३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपासून राज्यातील मृतांच्या संख्येत झालेली वाढ ही राज्यासाठी चिंताजनक आहे.बुधवारी राज्यात मृत्यू झालेल्या ३२ जणांमध्ये मुंबई २६, पुणे ३, सोलापूर १, औरंगाबाद १ आणि पनवेलमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृतांची वाढत असलेली संख्या ही मुंबईसाठी व राज्यासाठी धोक्याचे समजले जात आहे.

मृतांमध्ये २५ पुरुष तर ७ महिला आहेत. ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण तर १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या ३२ रुग्णांपैकी १८ जणांमध्ये (५६ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. तसेच २०५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने १५९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,३७,१५९ नमुन्यांपैकी १,२६,३७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ९९१५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ७२३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ९८११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४०.४३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात १,६२,८६० लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १०,८१३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

राज्यातील जिल्हा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे – 

 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू 

१ मुंबई महानगरपालिका ६६४४ २७० 

२ ठाणे ४६ २ 

३ ठाणे मनपा ३७३ ४ 

४ नवी मुंबई मनपा १६२ ३ 

५ कल्याण डोंबवली मनपा १५८ ३ 

६ उल्हासनगर मनपा ३ ० 

७ भिवंडी निजामपूर मनपा १५ ० 

८ मीरा भाईंदर मनपा १२५ २ 

९ पालघर ४१ १ 

१० वसई विरार मनपा १२८ ३ 

११ रायगड २३ ० 

१२ पनवेल मनपा ४६ २ 

ठाणे मंडळ एकूण ७७६४ २९० 

१३ नाशिक ५ ० 

१४ नाशिक मनपा १९ ० 

१५ मालेगाव मनपा १७१ १२ 

१६ अहमदनगर २६ २ 

१७ अहमदनगर मनपा १६ ० 

१८ धुळे ८ २ 

१९ धुळे मनपा १७ १ 

२० जळगाव ३० ८ 

२१ जळगाव मनपा १० १ 

२२ नंदूरबार ११ १ 

नाशिक मंडळ एकूण ३१३ २७ 

२३ पुणे ५८ ३ 

२४ पुणे मनपा १०६२ ७९ 

२५ पिंपरी चिंचवड मनपा ७२ ३ 

२६ सोलापूर ७ ० 

२७ सोलापूर मनपा ७८ ६ 

२८ सातारा ३२ २ 

पुणे मंडळ एकूण १३०९ ९३ 

२९ कोल्हापूर ७ ० 

३० कोल्हापूर मनपा ५ ० 

३१ सांगली २८ ० 

३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १ १ 

३३ सिंधुदुर्ग २ ० 

३४ रत्नागिरी ८ १ 

कोल्हापूर मंडळ एकूण ५१ २ 

३५ औरंगाबाद २ ० 

३६ औरंगाबाद मनपा १०३ ७ 

३७ जालना २ ० 

३८ हिंगोली १५ ० 

३९ परभणी ० ० 

४० परभणी मनपा १ ० 

औरंगाबाद मंडळ एकूण १२३ ७ 

४१ लातूर १२ १ 

४२ लातूर मनपा ० ० 

४३ उस्मानाबाद ३ ० 

४४ बीड १ ० 

४५ नांदेड ० ० 

४६ नांदेड मनपा ३ ० 

लातूर मंडळ एकूण १९ १ 

४७ अकोला १२ १ 

४८ अकोला मनपा २७ ० 

४९ अमरावती २ ० 

५० अमरावती मनपा २६ ७ 

५१ यवतमाळ ७९ ० 

५२ बुलढाणा २१ १ 

५३ वाशिम २ ० 

अकोला मंडळ एकूण १६९ ९ 

५४ नागपूर ६ ० 

५५ नागपूर मनपा १३२ १ 

५६ वर्धा ० ० 

५७ भंडारा १ ० 

५८ गोंदिया १ ० 

५९ चंद्रपूर ० ० 

६० चंद्रपूर मनपा २ ० 

६१ गडचिरोली ० ० 

नागपूर एकूण १४२ १ 

इतर राज्ये २५ २ 

एकूण ९९१५ ४३२