Indian post

भारतीय पोस्ट विभागाकडून महाराष्ट्र सर्कलसाठी (Recruitment in Indian post) २४२८ जागांवर भरती होणार आहे.

  भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया(Recruitment in Indian post) जाहीर केली आहे. पोस्टानं त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सर्कलमध्ये २४२८ जागांवर भरती होणार आहे.

  ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

  अर्ज कधी आणि कुठे करावा ?

  भारतीय पोस्टाच्या जाहिरातीनुसार https://appost.in/gdsonline/ या वेबसाईटवर २७ एप्रिल ते २६ मे या दरम्यान अर्ज करता येईल. उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल. नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करु शकतो.

  पात्रता

  या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच सायकलिंग देखील यायला हवे. जर कोणी दुचाकी चालवत असेल तर तो सायकल चालवित असल्याचे मानले जाईल.

  वयोमर्यादा आणि शुल्क
  या पदांवर भरती होण्यासाठी वय १८ ते ४० वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी ५ वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी ३ वर्ष वाढवून दिली जातील. अर्जाची फी १०० रुपये आकारण्यात येईल.

  पगार

  ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी १२ हजार रुपये, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक यांना १००० रुपये (४तासाच्या सर्विससाठी) पगार मिळेल.

  जागा आणि आरक्षण

  ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांच्या २४२८ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.

  आरक्षणाचे प्रमाण – खुला प्रवर्ग-११०५, एसटी- २४४, एससी -१९१, ओबीसी- ५६५, ईडब्ल्यूएस २४६, दिव्यांग- ७७ जागांवर भरती होणार आहे.