पाण्याची बाटली ठरली काळ ! बाटली ब्रेक पॅडलखाली अडकल्याने एक्स्प्रेस वेवर अपघात, ट्रकचालक ठार

ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकल्यामुळे ट्रक चालकाला ब्रेक दाबण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाण्याच्या दिशेला बोरघाटात अंडा पॉईंटजवळ ट्रकला अपघात झाला. अपघातात ट्रक चालक दीपक वाघमारे (रा. लोणीकंद) याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचे फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत.

  रायगड : पिण्याच्या पाण्याच्या बाटलीने एक मोठा भीषण अपघात घडवून आणलान त्यात एकाला प्राणही गमवावे लागले आहेत. हा धक्कादायक प्रकार मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर घडला असून ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकली यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन ट्रक चालकाला प्राण गमवावे लागले. काल (सोमवार 3 मे) दुपारच्या सुमारास खोपोलीजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघाताचे फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत.

  पाण्याची बाटली ठरली काळ
  मुंबई पुणे दृतगती महामार्गावर बोरघाटात ट्रकला अपघात झाला. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रवासात सातत्याने पाण्याची गरज लागते. ब्रेकजवळ ठेवलेली ‘जीवनदायी’ पाण्याची बाटलीच ट्रक चालकासाठी काळ ठरली.

  ट्रकचालकाचा जागीच मृत्यू

  ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकल्यामुळे ट्रक चालकाला ब्रेक दाबण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाण्याच्या दिशेला बोरघाटात अंडा पॉईंटजवळ ट्रकला अपघात झाला. अपघातात ट्रक चालक दीपक वाघमारे (रा. लोणीकंद) याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचे फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत.

  अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक बोरघाट टँपचे परदेशी आणि टीम, आयआरबी टीम, सेव्ह लाईफ फाऊंडेशन, तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदतकार्य करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. परंतु दुर्दैवाने ट्रक चालकाला जागीच मृत्यू आला होता.