कोल्हापुरात आज संध्याकाळी पुन्हा ४ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात ४४ कोरोनाबाधित

कोल्हापूर: आज सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दिवसभरात आठ रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासन पुरते हादरून गेले आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४४ वर पोहचली

 कोल्हापूर: आज सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दिवसभरात आठ रुग्ण वाढल्याने जिल्हा प्रशासन पुरते हादरून गेले आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४४ वर पोहचली आहे.त्यामुळे चिंता वाढली आहे. आज सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या मध्ये पालघर येथून  प्रवास करत कोल्हापूरला आलेला पन्हाळा तालुक्यातील २६ वर्षांचा तरुण,भुदरगड येथील २७ वर्षांची महिला व ८ वर्षांचा मुलगा,आणि अमरनाथ येथून आलेल्या २८ वर्षांच्या युवकाचा समावेश आहे.