कोल्हापूर जिल्ह्यात आज ३० कोरोना रुग्ण आढळल्याने संख्या पोहोचली २०९ वर

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २०९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण झाले असून अद्याप अंदाजे १७०० च्या आसपास स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती मिळाली आहे. आजच्या दिवसात एकूण ३०

 कोल्हापूर:  कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २०९  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण झाले असून अद्याप अंदाजे १७०० च्या आसपास स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती  मिळाली आहे. आजच्या दिवसात एकूण ३० रुग्ण आढळले आहेत.

पुण्या मुंबईसारख्या रेड झोनमधून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असल्याने कोल्हापूरच्या नागरिकांत एक प्रकारे संतप्त भावना असली तरीही मनात भीतीसुद्धा आहे.पाच सातवर असलेली रुग्ण संख्या अवघ्या ७ दिवसांमध्ये २०९ वर गेल्याने यंत्रणेवर सुद्धा प्रचंड मोठा ताण आला आहे.प्राण पणाला लावून डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ कार्यरत आहेत. पुण्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने आणि तिथल्या परिस्थितीला पाहून  घाबरलेल्या कोल्हापूरच्या नागरिकांनी ‘मेलो तरी आपल्या गावात’ असा विचार करून तेथून काढता पाय घेतला आणि कोल्हापूरची वाट धरली. मात्र दक्ष प्रशासनाने या कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या नागरिकांना वेशी बाहेरच अडवून त्यांना तपासणी करणे भाग पाडल्याने मोठ्या प्रमाणात कोरोना वाहक आढळून आले आहेत.
त्यांच्यावर आता सीपीआर आणि अन्य खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.