कोल्हापूर जिल्ह्यात २७८ कोरोना रुग्ण – शाहूवाडीत सर्वाधिक ८९

कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यात आज सायंकाळी ५ वाजता ८२९ प्राप्त अहवालापैकी १७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. तसेच ८११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १ नाकारण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण

 कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यात आज सायंकाळी ५ वाजता ८२९ प्राप्त अहवालापैकी १७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. तसेच ८११ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १ नाकारण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण २७८ पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ८९ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. 

आजची तालुका, मनपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- १५, भुदरगड- ३२, चंदगड- १८, गडहिंग्लज- १३, गगनबावडा- ५, हातकणंगले- ३, कागल- १, करवीर- १०, पन्हाळा- १५, राधानगरी- ४२, शाहूवाडी- ८९, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- १०, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-१६ असे एकूण २७४ आणि पुणे -१,  कर्नाटक- २ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण २७८ रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत.