लॉकडाऊनमधील शिथिलतेनंतर कोल्हापुरात वाढले कोरोना रुग्ण -आज ३ रुग्णांची नोंद

कोल्हापूर: लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली,ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये जाऊ पहाणाऱ्या कोल्हापुरात याच लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे आता परगावाहून विशेष करून मुंबईहुन जिल्ह्यात दाखल झालेल्या स्थलांतरित

कोल्हापूर: लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली,ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये जाऊ पहाणाऱ्या कोल्हापुरात याच लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे आता परगावाहून विशेष करून मुंबईहुन जिल्ह्यात दाखल झालेल्या स्थलांतरित नागरिकांच्या मधून कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.त्यामुळे जिल्ह्याच्या चिंता वाढत आहेत.आज ३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पूर्वपदावर येऊ घातलेल्या कोल्हापुरात आज अशाच परगावाहून दाखल झालेल्या आणखीन तिघाजणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे  आढळून आले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयातील अलगिकरण कक्षात दाखल असलेल्या दोघा युवकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने आज त्यांना कोरोना उपचार कक्षात तातडीने दाखल करण्यात आले आहे.

यामधील २३ वर्षीय युवक केरले (ता. शाहुवाडी) येथील, तर दुसरा २० वर्षीय युवक  शाहूवाडी तालुक्यातील माणगाव येथील आहे.तर मुंबईतून जिल्ह्यात दाखल झालेला तिसरा रूग्ण पन्हाळा तालुक्यातील सातवे गावचा आहे. तामिळनाडू येथून जिल्ह्यात दाखल झालेला केरले येथील युवक गेल्या तीन दिवसापूर्वी जिल्हा सरकारी रुग्णालयात प्रकृती बरी नसल्याने दाखल झाला होता.त्याचा कोरोना तपासणी वेळी.स्वैब घेण्यात आला होता. त्याचा आज दुपारी प्राप्त झालेला अहवाल कोरोना पॉझिटिव आला आहे.यातील आणखी एक युवक मुंबईतून प्रवास करून आलेला आहे. त्याची तपासणी केली असता त्याचाही स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांसह शाहूवाडी तालुक्यात आत्तापर्यंत एकूण सात कोरोना रुग्ण झाले आहेत. यापूर्वी पाच जण कोरोना ग्रस्त होते. ते पाचही कोरोना मुक्त होऊन गावी परतले आहेत. त्यापाठोपाठ आज दोघे युवक कोरोना बाधित आढळल्याने शाहूवाडी तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.