कोल्हापुरच्या मराठा कॉलनीतील रहिवाशांनी कोरोना योद्ध्यांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

कोल्हापूर : येथील कसबा बावडा मध्ये ६ एप्रिल रोजी कोरोनाचा रुग्ण आढळला होता.त्या दिवसापासून मराठा कॉलनी ४ मे पर्यंत म्हणजे २९ दिवस प्रतिबंधित करण्यात आली होती.आज मराठा कॉलनी प्रतिबंधित आदेशातून

 कोल्हापूर : येथील कसबा बावडा मध्ये ६ एप्रिल रोजी कोरोनाचा रुग्ण आढळला होता.त्या दिवसापासून मराठा कॉलनी ४ मे पर्यंत म्हणजे २९ दिवस प्रतिबंधित करण्यात आली होती.आज मराठा कॉलनी प्रतिबंधित आदेशातून मुक्त करण्यात आल्यानंतर ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गेले २९ दिवस अहोरात्र कोरोनाचा संसर्ग मराठा कॉलनी बरोबर कोल्हापूर शहरात संक्रमित होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा दिला त्यांच्या प्रति रस्त्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळ्या घालून फुलांचे सडे टाकून आणि टाळ्यांच्या वर्षावात पुष्प वृष्टी करत पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मराठा कॉलनीतील रहिवाशांच्या वतीने कोरोना योद्धा कृतज्ञता कार्यक्रम आयोजित करून अनोख्या ढंगात त्यांचा आणि जीवावर उदार होऊन कोरोनाबाधित वसाहतीत साफसफाईचे आणि औषधे फवारणी करणाऱ्या महापालिका आरोग्य व साफसफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.यावेळी रहिवाशांनी स्वतःहून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले होते.

आज सकाळी दहा वाजता मराठा कॉलनीतील रहिवाशांनी आयोजित केलेल्या या अनोख्या कार्यक्रमात रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना उभारून नागरिकांनी पोलिसांवर आणि मनपा सफाई कर्मचाऱ्यांवर फुलांची मुक्तपणे उधळण करत आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट करत कृतज्ञता व्यक्त केली.पहाटे पाच वाजल्यापासून आपापल्या दारात सडा टाकून रहिवाशानी  रांगोळ्या घातल्या होत्या. पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रति मान आणि सन्मान आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.

यावेळी कोल्हापूरच्या महापौर सौ.निलोफर आजरेकर,जिल्हा पोलीस प्रमुख डॉ.अभिनव देशमुख, शहर पोलीस उप अधीक्षक प्रेरणा कट्टे,शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड,एपीआय रविराज फडणीस,लाईन बाजार प्रभागाच्या नगरसेविका सौ.माधुरी लाड,डी.डी.पाटील,भागातील नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी ठाणेकर, विष्णुपंत जाधव,समीर मुजावर, नामदेव ठाणेकर, मोहित मदारे, सचिन पाटील,कपिल पुंगावकर,संदीप वाडकर,शिवाजी जाधव,संतोष गोणी,नितीन चौगले,दिगंबर साळोखे,सचिन मोरे,सचिन पायमल,धोंडीराम तेली,नामदेव बिरंजे, संदीप वाडकर,आर्शिल मुजावर आदींसह मराठा कॉलनी मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.