कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने उन्हाच्या झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरवासीयांना काही अंशी दिलासा मिळाला. आज

कोल्हापूर:  कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने उन्हाच्या झळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरवासीयांना काही अंशी दिलासा मिळाला.

आज दिवसभरात करवीर तालुक्यात सर्वाधिक ४५.७३ मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी १ मिमी पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- ४.२५ मिमी एकूण १०८.५० मिमी, शिरोळ- १ मिमी एकूण ३०.०९ मिमी, पन्हाळा- १६.४३ एकूण १५८.९१ मिमी, शाहूवाडी-२५.५० मिमी एकूण २१५.९१, राधानगरी- १६.८३ मिमी एकूण ७५.९८ मिमी, गगनबावडा- १५ मिमी एकूण ४२.०५ मिमी, करवीर- ४५.७३ मिमी एकूण ७४६.७३ मिमी, कागल- १९.४३ मिमी एकूण ४५८.५४ मिमी, गडहिंग्लज-११.८६ मिमी एकूण १९१.४४ मिमी, भुदरगड- १२.२० मिमी एकूण १०७.७१ मिमी, आजरा- १८.७५ मिमी एकूण १४४.१९ मिमी, चंदगड- २१.३३ मिमी एकूण ११२.६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.