कोकणाला पावसाने झोडपले ; नद्यांना महापूर तर बाजारपेठा बुडाल्या

रविवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुका पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसऱयांदा शहराला वेढा घातला आहे.

    कोकणात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर गेलेल्या पावसाने आता कोकणाला झोडपले आहे. रविवारपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर येथील अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून काही भागात ग्रामस्थ पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना समोर येत आहेत.

    रविवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुका पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. पावसामध्ये अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसऱयांदा शहराला वेढा घातला आहे. रविवारी रात्री उशिरा जवाहर चौकामध्ये धडक देणाऱया पुराच्या पाण्याने सोमवारी सकाळपर्यंत ठिय्या मांडला आहे. जवाहर चौकात पुराच्या पाण्याचा सुमारे सात तासांहून अधिक काळ शहराला वेढा राहिला आहे.