ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली भावपूर्ण श्रद्धांजली…

१६ मे रोजी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई आपल्यातून निघून गेल्या आणि आज १६ जून रोजी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे! संपूर्ण आयुष्य व्रतस्थ भावनेने पत्रकारिता करणारा, सामाजिक जाणिवा

१६ मे रोजी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई आपल्यातून निघून गेल्या आणि आज १६ जून रोजी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे! संपूर्ण आयुष्य व्रतस्थ भावनेने पत्रकारिता करणारा, सामाजिक जाणिवा जागृत ठेवून समर्पित भावनेने काम करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला आपण आज मुकलो. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित, उपेक्षित,गिरणी कामगार यांचे प्रश्न ऐरणीवर आणले.

बांगलादेश युध्दाचे प्रत्यक्ष वार्तांकन केले. मुंबईतील दंगलीचे वार्तांकन करताना या दंगलीचे सामाजिक वास्तव त्यांनी समाजापुढे मांडले होते. त्यामुळे माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली… अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.