विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसीय कोकण दौऱ्यांनंतर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दोन दिवसीय कोकण दौऱ्यांनंतर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी ५.३० वाजता बाळासाहेब ठाकरे स्मारकावर भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका कोकण विभागाला बसला आहे. तसेच अनेक लोकांचे नुकसान या निसर्ग चक्रीवादळामुळे झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांचा कोकण दौरा केला होता.

त्याचप्रमाणे त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली होती. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्दा दोन दिवसीय कोकण दौरा केला आणि तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. घरांचे आणि झाडांचे निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे, येथील लोकांसाठी मदतीच्या अहवालाविषयी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.