teacher

टीईटी परीक्षेला (TET Exam 2021)राज्यातून यंदा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गतवर्षी परीक्षा न झाल्याने आणि यंदा असलेल्या शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात टीईटी परीक्षेला १ लाख ३८ हजार १० उमेदवारांनी नोंदणी(TET Exam Registration 2021) केली आहे.

  मुंबई : शिक्षक भरतीसाठी(Teachers Recruitment) आवश्यक असलेल्या टीईटी परीक्षेला (TET Exam 2021)राज्यातून यंदा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गतवर्षी परीक्षा न झाल्याने आणि यंदा असलेल्या शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात टीईटी परीक्षेला १ लाख ३८ हजार १० उमेदवारांनी नोंदणी(TET Exam Registration 2021) केली आहे. त्यामुळे मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक कमी नोंदणी झाल्याचे दिसून आले.

  वर्ष  पेपर १      पेपर २  एकूण अर्ज
  २०१७ १६९९५०   १२७७२७   २९७६७७
  २०१८ ९५७८७ ७७६६२  १७३४४९
  २०१९  १८८६८८   १५४५९६ ३४३२८४
  २०२० ——– ———- ——–
  २०२१   ११६३४४ ७६१७६     १३८०१०

  शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता आणि सेवाशर्थी ठरवण्यासाठी केंद्र सरकारने २०१० मध्ये राष्ट्रीय शिक्षण शिक्षक परिषदेची शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषणा केली. त्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विनाअनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यामध्ये १० ऑक्टोबरला टीईटी परीक्षेचे घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र अनेकांनी नोंदणी करून अर्ज पूर्ण न भरल्याने ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीमध्ये टीईटी परीक्षेसाठी राज्यातून तब्बल १ लाख ३८ हजार १० अर्ज आले आहेत. यामध्ये पेपर एकसाठी १ लाख १६ हजार ३४४ तर पेपर दोनसाठी ७६ हजार १७६ इतके अर्ज आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली. टीईटी परीक्षेसाठी यंदा झालेली नोंदणी ही मागील काही वर्षांच्या तुलनेत फारच कमी झाल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये सीईटी परीक्षा झाली नव्हती. तसेच यंदा शिक्षक भरती होणार असल्याने टीईटी परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र प्रत्यक्षात फारच कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. पेपर दोनसाठी फारच कमी अर्ज आले आहेत.