चंद्रकांत पाटलांवर कारवाई करा, असे सांगणारा एका कोल्हापुरकराने जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशुन लिहिलेला संदेश व्हायरल

एका कोल्हापूरकराने अनाहूत संदेश देऊन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.हा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. काय म्हटले आहे या

 एका कोल्हापूरकराने अनाहूत संदेश देऊन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे.हा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

काय म्हटले आहे या संदेशात – 

आमच्या घरातील मी ,बायको, मुलगा मुबंईहुन आलो. आम्हाला परवानगी घ्यायला व वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन यायला पंधरा दिवस गेले. कोल्हापूरात येताना चार  ठिकाणी तपासणी करून शेवटी सीपीआरमध्ये कोरोना तपासणीसाठी स्वॅब दिला.रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी पंधरा दिवसात विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलं. कारण मुंबई ,पुणे नाशिकसह परजिल्ह्यातील रेडझोन मधून येणाऱ्या नागरिकांना नियम लागू केला आहे. ठीक आहे आम्ही सरकार सांगेल तसं आज पर्यंत करत  राहिलो. आजपर्यत पंतप्रधान मोदीजी,मुख्यमंत्री ठाकरेजी यांच्यासह सर्वांचे ऐकलं इथून पुढे ही ऐकू. मात्र एक खेदजनक बाब म्हणजे चार दिवसांपूर्वी माजी पालकमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरात आले .पुण्याहून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घेतली होती का ?   

चंद्रकांत पाटील यांची तपासणी कुठे झाली ? सीपीआर मध्ये त्यांचा स्वॅब घेतला का? घेतला असेल तर रिपोर्ट येईपर्यंत कुठे क्वारंटाईन केलं ? रिपोर्ट काय आला? कोरोना हा काही विशिष्ट वर्गाला होतो नाही, यामध्ये सर्वाना संसर्ग होऊ शकतो हे माहिती असून सर्वाना एक नियम पाहिजे. त्या नियमाचे पालन झालं का? . चंद्रकांत पाटील हे रेडझोन मधून कोल्हापूरात आल्यानंतर किती जण संपर्कात आलेत याची तपासणी केली आहे का? (माझ्या माहिती प्रमाणे १६० जण भेटले..पत्रकार धरून). कलेक्टर साहेब आम्ही ज्या ठिकाणाहुन कोल्हापूरात आलो त्या परिसरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. मात्र आम्ही तुम्ही सांगितलेले नियम पाळले. मात्र चंद्रकांत पाटील यांनी का नियम पाळला नाही हे पण आम्हाला सांगा ?  

कोरोना संकट विरोधात कलेक्टर साहेब तुम्ही व आयुक्त,जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा परिषद सीईओ , सिपीआर वैद्यकीय अधिकारी, सगळी चांगलं काम करता मात्र आज प्रामाणिक राहून आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता १८६० (४५) याच्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करावी, अशी या कोल्हापुरकराने विनंती केली आहे.