भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर, चित्रा वाघ यांच्यासह राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश

 चित्रा वाघ यांचा भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केल्यानंतर विजया रहाटकर यांचा गेल्या वेळी समावेश करण्यात आला होता, मात्र, आता त्यांचं नाव यादीतून काढण्यात आलं आहे. त्यासोबतच विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

  भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी आज (गुरूवार) जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालं आहे. तसेच ८० जणांच्या यादीत राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.  राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये आल्यानंतर चित्रा वाघ यांनी सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर विविध मुद्द्यांना धरून टीका केली आहे.

  चित्रा वाघ यांचा भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केल्यानंतर विजया रहाटकर यांचा गेल्या वेळी समावेश करण्यात आला होता, मात्र, आता त्यांचं नाव यादीतून काढण्यात आलं आहे. त्यासोबतच विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

  ८० सदस्यांची या यादीमध्ये महाराष्ट्रातील आधीच्या नावांसोबतच चित्रा वाघ यांचं नाव नव्याने समाविष्ट करण्यात आलं आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह ८० नेत्यांना सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले आहे. भाजप सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्रकाद्वारे कार्यकारिणीची माहिती दिली आहे. कार्यकारिणीमध्ये ५० विशेष आमंत्रित आणि १७९ कायमस्वरूपी आमंत्रित (पदभार) असतील. ज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय प्रवक्ते असतील, राष्ट्रीय मोर्चा अध्यक्ष, राज्यांचे प्रभारी, सह-प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, राज्य सरचिटणीस संघटना आणि आयोजक यांचा समावेश आहे. भाजपची ८० जणांच्या या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून एकूण १५ जणांचा समावेश आहे. त्यात चार नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.मात्र त्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

  राज्यातील नेत्यांना कार्यकारिणीत स्थान

  नुकतेच कँबिनेट मंत्री झालेले नारायण राणे यांच्यासह मागील दोन वर्षापासून पक्षात प्रवेश केलेल्या राज्यातील दिग्गज नेत्यांना या कार्यकारीणीत स्थान मिळाले नाही. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महिंलाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर आक्रमकपणे आरोप करणाऱ्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचीही कार्यकारिणीत सदस्यपदी वर्णी लागली आहे.

  राष्ट्रीय प्रवक्तेपदी संजू वर्मा आणि खा. हिना गावीत

  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सुनील देवधरही राष्ट्रीय सचिव झाले आहेत. विशेष निमंत्रितांमध्ये महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार आणि लढ्ढाराम नागवानी यांचा समावेश आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून मुंबईच्या संजू वर्मा आणि नंदुरबारच्या खासदार हिना गावीत यांना जबाबदारी दिली आहे. जमाल सिद्दीकी यांना अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्षपद दिले गेले आहे.

  नारायण राणेंचा समावेश नाहीच

  सुनील देवधर यांच्यावर भाजप नेतृत्वाने आंध्र प्रदेशची जबाबदारी दिली आहे. त्यांना आंध्र प्रदेशचे प्रभारी पद दिले आहे. विनोद तावडे यांना हरयाणाचे प्रभारी तर पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशचे प्रभारी करण्यात आले आहे. तर सी. टी. रवी, ओमप्रकाश धुर्वे आणि जयभान सिंह पवय्या यांना महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहेत. नारायण राणे यांना केंद्रात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद देण्यात आल्यानंतर या कार्यकारिणीत त्यांचा समावेश अपेक्षीत असताना त्यांचे नाव वगळण्यात आले आहे.