बेळगाव महापालिकेत भाजपची सत्ता ; महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुवा दोन जागांवर समाधान

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर ५८ प्रभागासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजप विरोधी महाराष्ट्र एकीकरण समिती, काँग्रेस, जनता दल , एमआयएम यांच्यामध्ये निवडणुकीच्या प्रमुख लढती झाल्या. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या राजकीय पाठबळाचा वापर करून उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली होती. तीन सप्टेंबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला.

    बेळगाव : अतिशय चुरशीने पार पडलेल्या बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला हरवून भाजपने घवघवीत ३६ जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला दोन जागावरच समाधान मानावे लागले आहे. निवडणुकीचा निकाल घोषित होताच भाजप समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली यावेळी जल्लोष करणाऱ्या भाजप समर्थकांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करून लोकांना पांगवले त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

    बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर ५८ प्रभागासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजप विरोधी महाराष्ट्र एकीकरण समिती, काँग्रेस, जनता दल , एमआयएम यांच्यामध्ये निवडणुकीच्या प्रमुख लढती झाल्या. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपल्या राजकीय पाठबळाचा वापर करून उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली होती. तीन सप्टेंबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मत मतमोजणी आवारात राजकीय पक्षांचे नेत्यांच्या बरोबरच समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांचे मतांची आकडेवारी पाहता सत्तेपर्यंत पोहोचतात काय असे चित्र निर्माण झाले होते .मात्र समितीच्या उमेदवारांच्या मतात घट होऊन भाजप उमेदवाराचे मताधिक्य सतत वाढतच राहिले. जसजसा निकाल बाहेर येऊ लागला. तसे भाजप उमेदवारांची पारडे जड असल्याचे दिसू लागले. त्यामुळे समितीच्या उमेदवारांनी तसेच समर्थकांनी मतमोजणी आवारातून काढता पाय घेतला ५८ प्रभागा पैकी ३६ प्रभागात भाजपाचे उमेदवार विजय झाले.त्यामुळे या पालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान होणार आहे.

    राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ९ ,महाराष्ट्र एकीकरण समिती २, जनता दल( शून्य), एमआयएम १,अपक्ष १०, असे उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपला ५८ पैकी ३६जागा मिळाल्याने पूर्ण बहुमत सिद्ध झाले आहे .त्यामुळे बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे .या पालिकेत भाजपला सत्ता मिळाली असल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाचे वातावरण आहे.

    खासदार संजय राऊत यांचे स्वप्न भंगले

    बेळगाव महानगरपालिकेचा निवडणूक निकाल आज जाहीर झाले असून भाजपाने महाराष्ट्र एकीकरण समितीची धुळधाण उडविली आहे. बेळगाव (शहर) म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती असे समीकरण आमदारकीनंतर आता महापालिकेतही यावेळी बदलताना दिसले. आज शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ३० जागा जिंकण्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा स्वप्नभंग झाला आहे.