राज्यात आज २२८७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, १०३ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : आज राज्यात २२८७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,३०० झाली आहे. तर आज १०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा २४६५ वर

 मुंबई : आज राज्यात २२८७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,३०० झाली आहे. तर आज १०३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा २४६५ वर पोहोचला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ६५ मृत्यू हे मागील महिन्याभरातील आहेत. तर आज २२५ रुग्ण बरे झाले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३१,३३३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज  एकूण ३८,४९३  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यात १०३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई  ४९, मीरा भाईंदर १०, नवी मुंबई  ४, पनवेल  ४, रायगड  ६, ठाणे १, नाशिक  १, अहमदनगर १ ,पुणे  १० , सोलापूर  ५ ,  सातारा ६ , सांगली ३ , अकोला ३ यांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६८ पुरुष आणि ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०३ मृत्यूपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ३९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या १०३ रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये ( ६७%)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २४६५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे १ मे ते ३० मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई २९, मीरा भाईंदर  ९, सातारा ६, सोलापूर ४, नवी मुंबई ३, रायगड ३, सांगली ३, पनवेल २, अकोला ३, ठाणे १, नाशिक १ आणि  अहमदनगर १ असे आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,८३,८७५ नमुन्यांपैकी ७२,३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३७३० झोन क्रियाशील असून आज एकूण १९,०१९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७१.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,७९,४५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२,५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५,०९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.