शाळेची घंटा १७ ऑगस्टला वाजणार – प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक

शिक्षण विभागाने(Education Department) लवकरच शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ऑगस्टमध्ये ब्रेक द चेन(Break The Chain) अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय(School Will Reopen) घेण्याचे अधिकार राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिले आहेत.

    मुंबई : मार्च २०२० पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे(Schools Closed Due To Corona) बंद आहेत. पण आता शिक्षण विभागाने(Education Department) लवकरच शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ऑगस्टमध्ये ब्रेक द चेन(Break The Chain) अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय(School Will Reopen) घेण्याचे अधिकार राज्य सरकारने शिक्षण विभागाला दिले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्टपासून पाचवी ते सातवीची शाळा सुरु करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

    राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याअंतर्गत हॉटेल्स, दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. आता पुढच्या टप्यात शाळा सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे.

     पुढील आठवड्यात बैठक
    सूत्रांनी स्पष्ट केले की, टास्क फोर्सबरोबर झालेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागावर सोपवण्यात आला होता. यानंतर आता शिक्षण विभागाकडून चाचपणी सुरु करण्यात आलेली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या संदर्भात अधिकाऱ्यांशी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. कोरोना संख्या कमी असलेल्या भागात सध्या ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे.

    प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची मानसिकता
    सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. पण ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. योग्य पद्धतीने शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याच्या मानसिकतेत शिक्षण विभाग आहे.

    आयटीआय प्रवेश
    दहावीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर राज्यभरातून आयटीआय प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत १ लाख ५४ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापेकी १३५८१३ विद्यार्थ्यांनी फॉर्म पूर्ण भरला आहे.तसेच १३१०६० विद्यार्थ्यांनी फी पूर्ण भरली आहे आणि ११३९४१ विद्यार्थ्यांनी ऑप्शनचा फॉर्म भरला आहे,अशीही माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

    बारावीचे निकाल लागल्यानंतर ५ ऑगस्टपासून महाविद्यालयीन शिक्षण प्रक्रियाही सुरु झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

    सीएसआर फंडमधून मदत
    मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार ४७१ सरकारी शाळांना सीएसआर फंडद्वारे मदत करणार आहे.यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत प्राथमिक बैठक आज संपन्न झाली. या बैठकीमध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह ४० मोठ्या उद्योजकांची उपस्थिती होती.पहिल्या टप्प्यामध्ये ४७१ सरकारी शाळांना सीएसआर फंडद्वारे मदत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शाळांसाठी आवश्यक सेवासुविधा या फंडमधून पुरवल्या जाणार आहेत.