प्रशासनात फेरबदल, २० महत्त्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

'बदली सरकार' म्हणून नेहमीच ट्रोल होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात दीपक मीना यांची नागपुर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिव पदी विकासचंद्र रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  ‘बदली सरकार’ म्हणून नेहमीच ट्रोल होणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात दीपक मीना यांची नागपुर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिव पदी विकासचंद्र रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  कोणाची कुठे नियुक्ती?

  ओ पी गुप्ता – 1992 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले ओ पी गुप्ता यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विभागाच्या प्रधान सचिव पदावरून आता वित्त विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

  विकास चंद्र रस्तोगी – 1995 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या विकास चंद्र रस्तोगी यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव पदावरून आता उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

  इंद्रा मालो – 1999 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या इंद्रा मालो यांची एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबईचे आयुक्त पदावरून सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई इथे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  रुबल अग्रवाल – 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या रुबल अग्रवाल यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त पदावरून आता आयसीडीसी नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  दौलत देसाई – 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या दौलत देसाई यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी पदावरून वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  रुचेश जयवंशी – २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या रुचेश जयवंशी यांची बदली हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदावरुन महिला व बाल विभाग, पुणे येथे आयुक्तपदी करण्यात आली आहे.

  संजय यादव – (आयएएस: एमएच: 2009) यांची बदली एमएसआरडीसी, मुंबई येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून झालीय.

  शैलेश नवाल – (आयएएस: एमएच: 2010), जिल्हाधिकारी, अमरावती यांना मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी नियुक्त करण्यात आलंय.

  आर. एच. ठाकरे – (आयएएस: एमएच: 2010) यांना नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलंय.

  जे. एस. पापळकर – (आयएएस: एमएच: 2010) अकोला जिल्हाधिकारी यांची अकोला महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय

  जी. एम. बोडके – (आयएएस: एमएच: 2010)यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदावरून हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

  राहुल अशोक रेखावार – (आयएएस: एमएच: 2011) यांची अकोल्याचे एमएस एसिड कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदावरून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय

  रवींद्र बिनवडे – (आयएएस: एमएच: 2012) यांची जालनाच्या जिल्हाधिकारी पदावरून थेट पुणे महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आलीय

  दीपककुमार मीना – (आयएएस: एमएच: 2013) यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

  पवनीत कौर – यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाचा कार्यभार होता.

  विजय चंद्रकांत राठोड – यांना जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

  निमा अरोरा – यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

  आंचल गोयल – यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

  डॉ. बी.एन.पाटील – यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.