राज्यातील कोरोना रुग्णांची लाखाच्या दिशेने घोडदौड – २२५९ नवे रुग्ण, १२० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता कोरोना रुग्णांनी एक लाखाच्या दिशेने कूच केली आहे. आज राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येने ९० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

 मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आता कोरोना रुग्णांनी एक लाखाच्या दिशेने कूच केली आहे. आज राज्यातील कोरोनाबाधितांची संख्येने ९० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज राज्यात २२५९ कोरोना रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांची संख्या ९० हजार ७८७ वर पोहचली आहे. त्याचवेळी १२० जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३२८९ वर पोहचली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर ३.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. आज १६६३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून,  राज्यात आजपर्यंत ४२ हजार ६३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४६.९६ टक्के एवढे आहे.

राज्यात १२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. मुंबई ५८, ठाणे १३, मीरा भाईंदर ६, पनवेल ३, वसई विरार २,नवी मुंबई १, नाशिक ३, पुणे १६, सोलापूर २, रत्नागिरी १, औरंगाबाद १०, अकोला २, अमरावती १, नागपूर १ आणि मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू नागपूरमध्ये झाला आहे. मृत्यूंपैकी ८० पुरुष तर ४० महिला आहेत. १२० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६२ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ९१ जणांमध्ये ( ७५.८ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूपैकी ४९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ११ मे ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७१ मृत्यूंपैकी मुंबई ४५, ठाणे ११,मीरा भाईंदर ६, औरंगाबाद ३, पनवेल २, नाशिक १, रत्नागिरी १, वसई विरार १ व इतर राज्यातील १ मृत्यू आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५,७७,८१९ नमुन्यांपैकी ९०,७८७ नमुने पॉझिटिव्ह (१५.७१ टक्के ) आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट ३७५० झोन क्रियाशील असून आज एकूण १८,९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.१६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ५,६८,०७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,९३० खाटा उपलब्ध असून सध्या २६,४७० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.