कोरोना पाठोपाठ तापमानाचा कहर सुरू -महाराष्ट्रात तापमान चाळिशी पार

मुंबई: राज्यात एकाबाजूला कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता तापमानाचा कहरही सुरु झाला आहे. बहुतांश जिल्ह्यात दिवसभरात ४० अंश सेल्सियस पार तापमान गेले आहे. काही दिवस असाच उकाडा राहणार असल्याचे हवामान

मुंबई:  राज्यात एकाबाजूला कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता तापमानाचा कहरही सुरु झाला आहे. बहुतांश जिल्ह्यात दिवसभरात ४० अंश सेल्सियस पार तापमान गेले आहे. काही दिवस असाच उकाडा राहणार असल्याचे हवामान खात्याचे के.एस.होसळीकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील तापमान पुढीलप्रमाणे आहे.

बारामती ४०, ठाणे ४०, उस्मानाबाद ४२, औरंगाबाद ४१, सांगली ४१, मालेगाव ४४, अकोला ४४, अमरावती ४२, गडचिरोली ४०, नागपूर ४२, वाशिम ४२, सोलापूर ४३, जळगांव ४३, पुणे ४०, नांदेड ४३, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४२, चंद्रपूर ४४, गोंदिया ४०, वर्धा ४२, यवतमाळ ४३ वर तापमान पोहोचले. त्यामुळे या भागात उकाड्याने नागरिक हैराण झाले.

मुंबईतील कुलाबा भागात वातावरण ३४ वर सांताक्रुज येथे ३४ वर तापमान पोहोचल्याने मुंबई आणि उपनगरातील नागरिक उकाड्याने हैराण झाले.