कोरफडीची लागवड करुन मिळवा लाखोंचा नफा; असा करा जोडव्यवसाय

लघुउद्योगांपासून ते मोठ-मोठ्या उद्योग कंपन्या कोरफडच्या उत्पादनांची विक्री करून करोडो रुपयांचा नफा मिळवत आहेत. आणि यामध्ये तुम्ही कोरफडची शेती करून लाखो रुपये कमवू शकता.

    मुंबई : अनेक लोकांना खासगी क्षेत्रात जॉब करण्यात रस नसतो. त्यांना व्यवसाय करण्याची इच्छा असते. मात्र व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल, नियोजन आणि वेळ अशा अनेक संकटाचा विचार करत असतात. आजपर्यंत आपण शेतीमधील व्यवसायाचे अनेक उदाहरण पाहिले आहेत. पण कमी पैशाची गुंतवणूक करुन कोरफडीवर उत्पन्न कस मिळवायचं हे आपण आज पाहणार आहोत.

    देशासोबतच विदेशातसुद्धा कोरफडची मागणी वाढली आहे. अलिकडे सौंदर्यप्रसाधने तसेच खाद्यपदार्थामध्ये कोरफड वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरफडच्या गुणधर्म सगळ्यांनाचं माहिती आहे. भारतात मोठ्या प्रमाणात कोरफडची शेती केली जाते. लघुउद्योगांपासून ते मोठ-मोठ्या उद्योग कंपन्या कोरफडच्या उत्पादनांची विक्री करून करोडो रुपयांचा नफा मिळवत आहेत. आणि यामध्ये तुम्ही कोरफडची शेती करून लाखो रुपये कमवू शकता.

    कोरफड व्यवसायाच्या पद्धती

    तुम्ही कोरफडची शेती सुरु करू शकता. हा कोरफड तुम्ही जवळच्या उत्पादन निर्मित करणाऱ्या कंपनीमध्ये किंवा मार्केटमध्ये विक्री करू शकता. त्याचबरोबर व्यवसाय वाढवण्याचा विचार असेल, तर तुम्ही प्रोसेसिंग मशीन बसवून उत्पादन निर्मितीसुद्धा करू शकता. हे खूप कमी पैशामध्ये तुम्ही करु शकता. दरम्यान कोरफडीपासून साबणासारखा दुय्यम व्यवसायही करू शकता. कॉस्मेटिक, मेडिकल इतर वैद्यकीय क्षेत्रात कोरफडचं वापर वाढला आहे. त्याचबरोबर ग्राहक आयुर्वेदिक अशा कोरफडच्या उत्पादनांना मोठी पसंती दर्शवतात. कोरफडच्या व्यवसायात तुम्ही ५० ते  ६० हजार रुपये गुंतवूण ४ ते ५ लाखांचा नफा मिळवू शकता.

    तुम्ही कोरफड प्रोसेसिंग प्लान्ट बसवू शकता त्यामधून कोरफड ज्यूस, जेल, पावडर अशा विविध उत्पादनांची निर्मिती करू शकता. यासाठी तुम्हाला ३ ते ५ लाखांची गुंतवणूक आवश्यक असते. कोरफडच्या शेतीमध्ये तुम्हाला साहित्य, प्लान्ट, खाद्य, हार्वेस्टिंग, कामगार, या गोष्टींवर खर्च करावा लागणार आहे. देशात एका वेळी कोरफडची शेती करून, त्यात ३ ते ५ वर्षांपर्यंत उत्पादन घेतलं जातं.