पंढरीच्या राजाच्या मंदिरात फळांच्या राजाची आरास

पंढरपूरात आज श्री विठूमाऊली आणि रखुमाईचा गाभाऱ्याला हापूस आंब्याची आरास केली आहे. सावळा विठ्ठल आमराईत असल्याचे आज दिसत आहे. आज संकष्टी चतुर्थी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हापूस

 पंढरपूरात आज श्री विठूमाऊली आणि रखुमाईचा गाभाऱ्याला हापूस आंब्याची आरास केली आहे. सावळा विठ्ठल आमराईत असल्याचे आज दिसत आहे.

आज संकष्टी चतुर्थी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हापूस आंब्याची आरास केली आहे. प्रत्येक सणानिमित्त फुलांची सजावट करतात. पण सध्या आंब्याचे दिवस असल्याने सजावट करण्यासाठी आंब्याचा उपयोग केला आहे. यासाठी कोकणातून हापूस आंबे मागवले आहेत.             

विठ्ठलाचे भक्त महाराष्ट्र पोलीस सायबर विभागाचे आयजी हरिष बैजल, अजय सालुखे, उमेशभाई भुवा,  दीपकभाई शहा आणि सुनिल उंबरे यांनी ही आरास करण्यासाठी हापूस आंबे मंदिर समितीकडे दिले आहेत.
पहाटेच्या  महापूजेनंतर गर्द हिरवी अंगी, शुभ्र सोवळे आणि शेला, डोक्यावर सोन्याचा मुकुट असा साज केला आहे तर रुक्मिणी मातेस जांभळया रंगाची पैठणी, दागिने असा साज केला आहे. सावळया विठूरायाचे रूप आमराईमुळे अधिकच लोभस दिसत आहे.