मराठी अभ्यास केंद्राकडून भाषा पुरस्कारांची घोषणा – सुशांत देवळेकर, सुषमा पाध्ये आणि दिपाली जगताप यांचा होणार सन्मान

अधिवक्ता शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ सुशांत देवळेकर(award to sushant devlekar) यांना जाहीर झाला असून जयवंत चुनेकर ‘प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कारा’साठी ग्राममंगलच्या प्रयोगशील व विद्यार्थिप्रिय शिक्षिका सुषमा पाध्ये(teacher sushma padhye) यांची निवड झाली आहे.

    मुंबई : मराठी अभ्यास केंद्र(marathi study centre) ही विविध कृतिगटांच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनाचे कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेमार्फत मराठी भाषेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना प्रोत्साहन म्हणून न्यायालयीन मराठीच्या चळवळीचे अध्वर्यू अधिवक्ता शांताराम दातार,अभ्यास केंद्राचे हितचिंतक व भाषाभ्यासक जयवंत चुनेकर यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी दोन पुरस्कार देण्यात येतात. भाषा पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष असून यंदापासून दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्कार या आणखी एका पुरस्काराची घोषणा(award declaration) केंद्राने केली आहे.

    अधिवक्ता शांताराम दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ सुशांत देवळेकर यांना जाहीर झाला असून जयवंत चुनेकर ‘प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कारा’साठी ग्राममंगलच्या प्रयोगशील व विद्यार्थिप्रिय शिक्षिका सुषमा पाध्ये यांची निवड झाली आहे. मराठी भाषेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे वार्तांकन व निवेदन सातत्याने करणाऱ्या दीपाली जगताप यांना दिनू रणदिवे मराठी स्नेही माध्यमकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

    विविध व्यवहारक्षेत्रांत मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी मराठी अभ्यास केंद्र विविध कृतिगटांच्या मार्फत काम करते. गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र विविध व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्याने विशेष कार्यरत आहे.

    दरवर्षी हे भाषा पुरस्कार मराठी भाषा दिनाला समारंभपूर्वक प्रदान केले जातात. मात्र यंदा कोविडमुळे त्यांचे वितरण पुढे ढकलावे लागत आहे. परिस्थिती सामान्य होताच ते पुरस्कार संबंधितांना दिले जातील, अशी माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रकाश परब यांनी दिली आहे.