एमबीए सीईटीचा निकाल जाहीर

मुंबई:राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल सीईटी सेल कक्षाच्या वतीने आजसकाळी जाहीर करण्यात आला आहे. शशांक चंद्रहास प्रभू

 मुंबई: राज्यभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल सीईटी सेल कक्षाच्या वतीने आजसकाळी जाहीर करण्यात आला आहे.  शशांक चंद्रहास प्रभू हा विद्यार्थी १५९ गुण मिळवून पहिला आला आहे. त्याला ९९.९९ इतके गुण आहेत. या परीक्षेत केवळ  ४ विद्यार्थ्यांना २०० पैकी १५० हून अधिक गुण मिळाले आहेत तर १२६ ते १५० पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा ३९२ आहे. गेल्या १४ आणि १५ मार्च रोजी राज्यातील १४८ केंद्रावर ही परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आला आहे. ५१ ते १०० पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अंकित ठक्कर आहे. त्याला १५५ गुण आहेत तर तिसऱ्या स्थानावर आकांक्षा श्रीवास्तव आहे. हिला १५३ गुण मिळाले आहेत. सीईटी सेलच्या वतीने या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेली  सीईटी परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर निकालही जाहीर करण्यात आले आहे. मुंबईसह राज्यातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या महाविद्यालयांमध्ये सुमारे 3६ हजार ७६५ हजार जागा आहेत. या जागावर सीईटीत मिळालेल्या मेरिट गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.