राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी बदली

कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी

कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती झाली आहे.डॉ.रामानंद यांनी दोन वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले होते.

कोरोना विषाणूमूळे उदभवलेल्या परिस्थितीला हाताळण्यात तसेच कर्तव्यात अकार्यक्षमपणा असा ठपका ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार डॉ.मिनाक्षी गजभिये यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. डॉ. जयप्रकाश रामानंद हे सध्या धुळे येथील शासकीय महाविद्यालयात प्रोफेसर पदावर  कार्यरत आहेत.कोल्हापूर च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी नियुक्ती झाल्याचे समजताच डॉ.रामानंद हे  तात्काळ धुळ्याहून कोल्हापुरला यायला निघाले असून  उद्या सकाळी ते आपल्या पदाचा पदभार स्विकारणार आहेत.अहमदनगरच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांचीही राज्यसरकारने बदली केली असून त्यांची धुळे येथील शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या कोल्हापूरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून. जिल्हा सरकारी रुग्णालय व्यवस्थित कार्यरत आहे.मुंबई,पुणे, आणि इतर जिल्ह्यातून होणाऱ्या स्थलांतरित नागरिकांच्या मूळे  गेल्या आठ दिवसात कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या ७ वरून २६० वर पोहोचली आहे.दररोज या संख्येत मोठ्या संख्येने भर पडत असून आज दिवसभरात कोरोनाचे आणखी ३२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अकार्यक्षम असल्याच्या कारणावरून छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांचीसुद्धा लवकरच उचलबांगडी होणार असल्याचे बोलले जात आहे.मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही.