uday samant

राज्यात महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात(Colleges To Start Soon) राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत(Uday Samant Press Conference) यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

    कोरोनाचा(Corona) प्रसार थांबवण्यासाठी राज्यातली सर्व शाळा महाविद्यालयं सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. सध्या सगळे शिक्षण ऑनलाइनच सुरु आहे. मात्र आता महाविद्यालयं उघडण्यासंदर्भात(Colleges To Start Soon) राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत(Uday Samant Press Conference) यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे.

    राज्यात १ नोव्हेंबरपासून सर्व महाविद्यालयं सुरू कऱण्याचा आमचा मानस असून त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करत आहोत, असे उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

    यावेळी ते म्हणाले की, सीईटी परीक्षा झाल्यावर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सीईटी परीक्षेच्या तारखाही सामंत यांनी यावेळी जाहीर केल्या. ते म्हणाले, यावर्षी सीईटीला एकूण आठ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या वर्षी सीईटीची १९७ केंद्रे होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून २२६ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने यंदा ही परीक्षा होईल. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.