राज्यात मान्सून धडकण्याआधी हवामान खात्याने दिलाय महत्त्वाचा इशारा, या ५ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची(Rain in Maharashtra) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

    मुंबई : गेल्या आठवड्यात अंदमान निकोबार बेटांवर नैऋत्य मोसमी वाऱ्याचं (Monsoon) आगमन झालं आहे. तसेच येत्या तीन दिवसांमध्ये केरळमध्येही मान्सून (Monsoon will arrive soon in kerala) दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल व्हायला अद्याप २ आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. तत्पूर्वी पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची(Rain in Maharashtra) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे २०२१ पासून ईशान्येकडील राज्यांसह दक्षिण-पूर्वेकडील सर्व राज्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यामुळे महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, केरळ या राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर ३१ मे ते १ जून दरम्यान उत्तरेकडील राज्यांतही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

    ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येऊन धडकलेल्या यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विदर्भात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

    उद्या २९ मे रोजी विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात उद्या ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.