अखेर ‘त्या’ मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करणाऱ्यांना पोलिसांनी दिली समज

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरातील बरेच नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडून लॉकडाऊनचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याबाबत वर्तमानपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. श्रीवर्धन दिवेआगर रोड त्याचप्रमाणे

 श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरातील बरेच नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडून लॉकडाऊनचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याबाबत वर्तमानपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. श्रीवर्धन दिवेआगर रोड त्याचप्रमाणे श्रीवर्धन समुद्र किनारा तसेच जांभूळ तळे व नगरपालिकेच्या मागे डोंगरावर असलेल्या दर्गा याठिकाणी बरेच नागरिक मॉर्निंग वॉक साठी जात असल्याचे निदर्शनास आले होते. शहरातील बहुसंख्य नागरिक लॉकडाऊनचे व्यवस्थितपणे पालन करत असून केवळ मॉर्निंग वॉकच्या नावाखाली बाहेर पडणाऱ्या नागरिकांवरती कारवाई करण्यात यावी,अशी बहुसंख्य नागरिकांची इच्छा होती. श्रीवर्धन पोलिसांनी आज समुद्रकिनारा तसेच श्रीवर्धन दिवेआगर मार्गावरून काही मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करून श्रीवर्धन शहरातील शिवाजी चौकामध्ये आणण्यात आले. त्याठिकाणी सर्वांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक लिहून घेण्यात आला व त्यांना समज देऊन सोडण्यात आले. जर पुन्हा मॉर्निंग वॉक करताना सापडला तर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट समज सर्व मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना दिली गेली. श्रीवर्धन पोलिसांनी केलेल्या कामगिरीबाबत शहरातील नागरिकांकडून पोलिसांना धन्यवाद देण्यात येत आहेत.