MPSC ची परीक्षा पुढील आठवड्यात? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच जाहीर करणार परीक्षेची तारीख

मुख्यमंत्री लवकरच परीक्षेची पुढील तारीख जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत मुख्यमंत्री लवकरच घोषणा करतील असेही सांगण्यात येत आहे. हि परीक्षा पुढील आठवड्यात किंवा येत्या १० दिवसांत घेण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

    १४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळाला. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, राम सातपुते यांच्याही समावेश होता. या निर्णयाविरोधात राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. युवा कॉंग्रेसचे सत्यजित तांबे, एनसीपी आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहत एमपीएसीने कोरोना संकटात पुरेशी खबरदारी घेत परीक्षा घेण्याची विनंती सरकारकडे केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लवकरच परीक्षेची पुढील तारीख जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याबाबत मुख्यमंत्री लवकरच घोषणा करतील असेही सांगण्यात येत आहे. हि परीक्षा पुढील आठवड्यात किंवा येत्या १० दिवसांत घेण्यात येणार असल्याचे समोर येत आहे.

    दरम्यान, गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. MPSC च्या उमेदवारांना देखील याचा फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा MPSC कडून पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे.