राज्य सेवा मुख्य परीक्षा ४ ते ६ डिसेंबर दरम्यान होणार, परीक्षा केंद्रांची माहिती जाणून घ्या

राज्यसेवा(MPSC Main Exam) मुख्य परीक्षा -२०२० ही ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हा केंद्रावर होणार आहे.

    राज्यसेवा(MPSC Main Exam) मुख्य परीक्षा -२०२० ही ४, ५ व ६ डिसेंबर, २०२१ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हा केंद्रावर होणार आहे.

    परीक्षेबाबत राज्य सेवा आयोगाकडून काढण्याता आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२०, दिनांक ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून, मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली होती.