मुंबईने घेतला पहिल्यांदा मोकळा स्वच्छ हवेचा श्वास

मुंबई : जागतिक वसुंधरा दिवस नुकताच साजरा करण्यात आला. पण पहिल्यांदाच या वर्षी बुधवारी झालेल्या वसुंधरा दिनी मुंबईकरांना स्वच्छ मोकळ्या हवेचा श्वास घेतला.गेल्या संबंध वर्षातील सर्वात स्वच्छ हवेची या

मुंबई : जागतिक वसुंधरा दिवस नुकताच साजरा करण्यात आला. पण पहिल्यांदाच या वर्षी बुधवारी झालेल्या वसुंधरा दिनी मुंबईकरांना स्वच्छ मोकळ्या हवेचा श्वास घेतला.गेल्या संबंध वर्षातील सर्वात स्वच्छ हवेची या दिवशी नोंद झाल्याचे  सिस्टिम ऑफ एअर क्वालीटी वेदर फॉरकास्टिंग अॅण्ड रिसर्च (सफर) संस्थेच्या अहवालात नमूद केले आहे.

या संस्थेच्या अहवालानुसार एअर क्वालिटी इंडेक्स(एआयक्यु)४६ असल्याचे म्हटले असून नोंदी नुसाह ही उत्तम श्रेणी असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात असा इंडेक्स नोंदविला गेला होता. त्यानंतर वर्षाच्या आतच ही नोंद होणे सुखद असल्याचेही सफरच्या अहवालात म्हटले आहे. 

इतकेच नव्हे तर लॉकडाऊन सुरू असल्यापासून मुंबईचा एआयक्यु ५१-१०० च्या घरात असल्याचे आढळून आले आहे. मुंबईतील १० ठिकाणी सफरने शुद्ध हवेची मात्रा तपासली असून माझगाव मध्ये सर्वांत शुद्ध मात्रा अर्थात १८ एआयक्यू आढळून आले आहे. तर नवीमुंबई सर्वात प्रदुषित ७५ एआयक्यु आढळून आली आहे.

वसुंधरा दिनी हवेची मात्रा तपासणे या मुख्य उद्देशाने सफरने मुंबईतील दहा ठिकाणांवर संबंधित यंत्रणा ठेवली होती. विशेष बाब म्हणजे मुंबई आणि परिसरातील हवाच नव्हे तर लॉकडाऊन असल्यामुळे जलप्रदुषणही बऱ्याच अंशी घटल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.