मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ३ मे पर्यंत लांबणीवर

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवी स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व  प्रात्यक्षिक परीक्षा ३ मे पर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. ३ मे नंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. १५ एप्रिल २०२० च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्न कॉलेजच्या पदवी स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व  प्रात्यक्षिक परीक्षा  ३ मेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात ३ मे नंतर शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.

२०२० च्या उन्हाळी सत्राच्या मे व जून मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या असून त्याचे स्वतंत्र परिपत्रक काढण्यात येणार आहेत.

 परीक्षा संख्या – मानव्य विद्याशाखा ९५, वाणिज्य व व्यवस्थापन १०१, विज्ञान व तंत्रज्ञान ३८१, आंतरविद्याशाखीय अभ्यास १८२ , एकूण परीक्षा ७५९

कोरोनामुळे लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर युजीसी, राज्य शासन व विद्यापीठ परीक्षेसंदर्भात गांभीर्यपूवक विचार करीत आहे. अनेकांनी याबाबत सूचना केलेल्या आहेत, यासंदर्भात लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले आहे.